अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : डॉ. एच. एन. सिन्हा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पातूर च्या यिन अध्यक्ष पदाकरिता महाविद्यालयात निवडणूक घेण्यात आली होती सदर निवडणूक मतदान प्रक्रिया ही दिनांक 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर दोन दिवस ऑनलाइन प्रणालीने झाली. ह्यामध्ये महाविद्यालयात प्रवेशित सर्व विद्यार्थी उमेदवारांना मतदान करून निवड करणार होते. ह्यामध्ये महाविद्यालयातील एम. एस्सी. केमिस्ट्री भाग 2 चे विद्यार्थी आकाश गुलाबराव हिवराळे ह्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिक्षण क्षेत्रात सतत कार्य करत असल्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडत असलेल्या आकाश हिवराळे ह्यांना विद्यार्थ्यांनी बहुमताने विजयी करून महाविद्यालयिन यिन अध्यक्ष पदाची मतदान रुपी माला आकाश हिवराळे ह्यांना विजयी करून त्यांच्या गळ्यात टाकली असू त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक होत असून असंख्य युवकांनी त्यांना शुभेच्छा देऊन सोबत असल्याचे पाठबळ दिले आहे.