सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम :_अनसिंग येथिल पी. डी. जैन कला महाविद्यालयात रासेयोच्या वतीने युवा लसीकरण कार्यक्रम आज संपन्न झाला महाविद्यालयातील व परिसरातील 18 वर्षावरील विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम ग्रामिण रूग्णालय अनसिंग व विद्याथी विकास विभाग – राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुल्हाने हे होते. लसीकरण कार्यक्रमासाठी ग्रामिण रूग्णालय अनसिंग येथील डॉ. श्रीमती जी एम पारवेकर, भगत , एस पी रंगवा, एस मनोहर,कोकाटे हे उपस्थित होते. या सर्वांचे महाविद्यालयामार्फत स्वागत करण्यात आले. मागील तीन दिवसापासून पासून लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांशी, त्यांच्या पालकांशी महाविद्यालयामार्फत संपर्क साधण्यात आला. या बाबत जागृती करून त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यात आले. महाविद्यालयातील या सत्रात प्रवेशित 80% विद्यार्थ्यांनी लस घेतली आहे.आज संपर्क केलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात उपस्थित राहून लस घेतली. यापुढेही उर्वरित विद्यार्थ्यांची महाविद्यालया मार्फत सतत संपर्क साधण्यात येणार असून महाविद्यालयातील प्रवेशित 100% विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण होण्याची अपेक्षा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुल्हाने यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे संचालन नोडल अधिकारी प्रा. डॉ. विनोद राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सचिदानंद बिचेवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.