आमदार नितीन देशमुख यांनी स्वतः भेट देऊन चार लाखाचा धनादेश शेतकरी वारस पत्नी यांना केला सुपूर्द
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : तालुक्यातील मौजे गोंधळवाडी येथील श्रीकृष्ण उर्फ किसन तुकाराम देवकर यांचा दिनांक 06/10/2021 रोजी शेतात काम करीत असतांना अंगावर वीज पडून मृत्यू झाला. त्याअनुषंगाने नैसर्गिक आपत्ती शासन निर्णयानुसार त्यांची वारस पत्नी नामे अश्विनी श्रीकृष्ण देवकर यांना त्यांचे राहते घरी जाऊन माननीय आमदार श्री नितीन देशमुख यांचे हस्ते रुपये 400000/- चार लाख धनादेश अदा करण्यात आला. माननीय आमदार यांचे सोबत पातुर तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री.दीपक बाजड यांच्या जनसामान्यांच्या हिताकरिता सदैव कार्यतत्पर राहून तालुक्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक मालाची नुकसान भरपाई करिता अतोनात प्रयत्न शेतकऱ्यांच्या पिकांचे शेत सर्वे करून नुकसान भरपाई अहवाल शासनाच्या समोर मांडून पातुर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मोबदला देण्याचे सर्व बँकांना सूचना देण्यात आल्या याकरिता आमदार नितीन देशमुख यांनी स्वतः पाहणी करून शेतकऱ्यांच्या झालेल्या नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई करण्याचे आम्ही सदैव प्रयत्न करू व शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे असल्याचे त्यांच्या या कार्यातून दिसून आले आहे याआदी गणेश वालोकार गुरुवार पेठ याचा अल्पशा आजाराने निधन झाले होते गणेश हा दोन्ही पायांनी अपंग असल्याने तहसीलदार दीपक बाजड यांनी स्वतः गणेश च्या कुटुंबाला भेट देऊन स्वर्गीय गणेश यांच्या पत्नी ह्या सुद्धा अपंग असल्याचे त्यांना दिसून आले व तात्काळ त्यांनी वीस हजार रुपयांची रोख रक्कम चेकच्या माध्यमातून दिली आहे, व देशमुख वेटाळ पातूर येथील स्वर्गीय बंड यांच्या गरीब कुटुंबाचे शत अतिवृष्टी पावसाने कोसळल्याने तहसीलदार दीपक बाजड यांनी स्वतः भेट घेऊन त्यांना सुद्धा मदतीचा हात आपत्कालीन रोख रकमेच्या माध्यमातून दिला आहे यावेळी तलाठी डी.एम. डाबेराव उपस्थित होते व गोंधळ वाडी येथील गावकऱ्यांच्या समक्ष आमदार नितीन देशमुख व तहसीलदार दीपक बाजड यांनी नैसर्गिक वीज पडून मृत्यू झालेल्या स्वर्गीय श्रीकृष्ण देवकर यांच्या कुटुंबाला मदत केली आहे











