जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातूर
लातूर /येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील समाजकार्य विभागातील तृतीय वर्गात शिकत असलेली कु. गिता बंडगर व रोहित स्वामी यांनी एड्स जनजागृती प्रश्न मंजुषा स्पर्धेत सर्व प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादित केले आहे. या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रूपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र असे आहे. त्यांना विभाग प्रमुख डॉ.दिनेश मौने यांचे मार्गदर्शन लाभले.
महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, लातूर अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक मार्फत एच.आय.व्ही.एड्स जनजागृती प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे व समाजकार्य विभाग प्रमुख डॉ.दिनेश मौने यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला यावेळी समाजकार्य विभागातील प्रा.काशिनाथ पवार, डॉ.संजय गवई, प्रा.आशिष स्वामी, प्रा.दत्ता करंडे, प्रा.नागेश जाधव, युनिसेफचे जिल्हा समन्वयक नीलेश सातपुते आणि मनोज मोरे यांची उपस्थित होती.
त्याच्या उज्वल भवितव्यासाठी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सर्व सन्मानिय पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, कार्यालयीन लेखापाल गणेश शेटे, विसरेन उटगे, नंदु काजापुरे, बालाजी डावकरे, संतोष येचेवाड, रोहित पवार, समाजकार्य विभागातील बीएसडब्ल्यू प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यी विद्यार्थीनी यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.