अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातुर (दि २८ ॲाक्टोबर २१)- श्री. शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित डॅा एच एन सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालय पातुर हे संपूर्ण पातुर आणि आजुबाजूच्या परिसरातील सर्वात जुणे आणि नावाजलेले महाविदयालय आहे.
शिक्षणमहर्षी डॅा.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी, मजुर, वंचीत घटकांना शिक्षण मिळावे त्यांची प्रगती व्हावी या उदात्त हेतुने शिक्षणाची गंगा गरीबांच्या झोपडीपर्यंत आणली.
महाविद्यालयाने आतापर्यंत विविध क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. कबड्डी या खेळामध्ये महाविद्यालयाचा संपूर्ण जिल्हयात नावलौकीक आहे.अनेक खेळाडु जिल्हा, विद्यापीठ, राज्य, राष्ट्रीय स्तरावर नावलौकीक प्राप्त आहेत. आज शासनाच्या विविध विभागात हे खेळाडु कार्यरत आहेत. शेतीमाती खेळ, संस्कृती जोपासणे गरजेचे आहे. हा भाऊसाहेबांचा संदेश सोबत घेवुन नुकताचं मोर्शी येथे पार पडलेल्या विदर्भ महालीग कबड्डी स्पर्धा २०२१ च्या निवड चाचणी मध्ये जवळपास ४०० च्या वर कबड्डी खेळाडुंमधुन डॅा. एच.एन.सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयातील किसन कावळे व विकास वानखडे या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
संपूर्ण अकोला जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद अशी बाब आहे.
येत्या १७ ॲाक्टोबर रोजी मोर्शी येथे ११ स्पॅान्सर्स लिलावामध्ये बोली लावुन संघ निवडण्यात आले. स्पर्धेमध्ये विजेता, उपविजेता व तृतीय संघांकरीता अनुक्रमे १ लाख, ७१ हजार व ५१ हजारांची बक्षीसे ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १ लाखांपर्यंत वैयक्तीक बक्षीसे देखील जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या झालेल्या या निवडी बद्दल श्री. शिवाजी शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, उपाध्यक्ष गजाननराव पुंडकर, उपाध्यक्ष डॅा रामचंद्र शेळके, कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, केशवराव मेतकर, प्राचार्य केशवराव गावंडे व सर्व सन्माननीय कार्यकारीणी सदस्य यांनी तसेचं महाविद्यालय विकास समीती च्या सर्व सन्माननीय मान्यवरांनी दोन्ही खेळाडुंचे अभिनंदन केले आहे.भविष्यात पातुर परिसरातील सर्व खेळाडुंसाठी महाविद्यालयात आवश्यक व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील असे प्रतीपादन प्राचार्य डॅा किरण खंडारे यांनी केले.दोन्ही खेळाडूंनी आपल्या निवडीचे श्रेय आई-वडील, प्राचार्य किरण खंडारे, क्रिडा शिक्षक प्रा. सुरेश लुंगे, डॅा अनिल देशमुख व महाविद्यालयातील शिक्षकांना दिले आहे.या दोन्ही खेळाडुंवर जिल्हाभरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











