पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड दि.28 : तीन महिला आमदारांचा समावेश कन्नड तालुक्यात महिला व बालकांचा हक्क आणि त्याच्यासाठी सरकार कडून येत असलेला निधी व्यवस्थित खर्च होतो की नाही यासाठी विधिमंडळाच्या शासकीय महिला समितीचा दौरा तालुक्यात गुरुवारी होता. या समितीत आमदार मनिषा कायंदे, आमदार.लता सोनवणे,आमदार. मंजुळा गावित यांच्या समिती सोबत अधिकाऱ्यांसह प्रथम अंधानेर ग्रामपंचायतीला भेट दिली. अंधानेर येथील ग्रामपंचायतीच्या महिला सदस्य,अंगणवाडी सेविका,मदतनीस, ग्रा.वि.अ व सरपंच यांच्याशी चर्चा केली. तसेच अंधानेर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या आवारात तयार करण्यात आलेल्या डेन्स फॉरेस्ट ला भेट दिली. त्यानंतर कन्नड शहरात नगर परिषद येथे भेट देऊन हातनूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात व अंगणवाडी ला भेट दिली. या समिती सोबत उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते,तहसीलदार संजय वारकड, नायब तहसिलदार शेख हारून,प्रभारी गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांच्यासह प्रत्येक विभागाचे तालुकास्तरिय अधिकारी उपस्थित होते.