किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : पंचायत समिती अंतर्गत ग्राम बोडखा येथे दूषित पाण्यामुळे गेल्या आठ वर्षात पंचवीस ते तीस नागरिकांचा किडनी आजाराने मृत्यू झाला असून आज रोजी या गावांमध्ये 10 चे वर किडनी आजाराने नागरिक ग्रस्त आहेत. या गावातील ग्रामपंचायत ने लाखो रुपये खर्च करून एक्वा सेंटर उभारले आहे. परंतु या अँक्वा सेंटरचा कोणीही उपयोग न घेतल्याने अँक्वा सेंटर धुळे खात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे अँक्वा सेंटर नादुरुस्त असून त्याच्यावर आतापर्यंत दुरुस्तीच्या नावाखाली हजारो रुपये बिले काढण्याचा प्रताप ग्रामपंचायत ने केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीनी या गंभीर आजाराविषयी कोणत्या प्रकारची जनजागृती केली नाही. सदर गाव मागासवर्गीय वस्ती असून या गावात दूषित पाण्याविषयी प्रबोधन करणे गरजेचे आहे. गावात शेकडा 80 टक्के नागरिक हे किडनी आजाराने बाधित होत आहेत. गावातील अँक्वा सेंटर चालु करणे गरजेचे आहे. बोडखा गाव नदीच्या काठावर बसलेले असून या गावातील विहीरी मधील व हातपंपा मध्ये क्षाराचे चे प्रमाण जास्त आहे. गावातील विहीर ही पाणी पिण्यायोग्य नसल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. गावात सार्वजनिक विहिरी मध्ये प्रचंड प्रमाणात घाण आहे या घान युक्त दूषित पाण्याचा पुरवठा बोडखा वासियांना होत आहे. या गंभीर घटनेकडे पातुर तालुका आरोग्य विभाग व पाणी पुरवठा विभागाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे