गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा :- सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती तेल्हारा शहर व तालुक्याच्या वतीने नगरपरिषद कार्यालय येथे तेल्हारा शहरातील मुख्य चौकामध्ये असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातील सर्व लाईट लावणे (Gate Lamps) , वाटर फाउंटन स्वच्छता करून चालू करणे, व दिवाळीच्या आधी सर्व परिसराची स्वच्छता करून तिथे लायटिंग लावण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.त्यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती तेल्हारा चे शहराध्यक्ष सौरभ खारोडे ,तालुकाध्यक्ष अभिजीत चतारे , उपाध्यक्ष गौरव धुळे , किरण साळुंके .तसेच अनिकेत बकाल, बजरंग खाडे, वैभव देशमुख , शिवम राऊत, शिवा अमृतकर ,किशोर डांबरे, गणेश बोळे उपस्थित होते.