अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगाव
मालेगाव : तालुक्यातील ग्राम अमानवाडी येथे नवदुर्गा उत्सव मंडळ व आम्ही रुग्णसेवक या ग्रुपच्या वतीने दि. 10 ऑक्टोंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अमनवाडी गावातील 40 रक्तदात्यांनी रक्तदान करून करोना काळात नवदुर्गा उत्सववा निमित्य इतर कोणतीही कार्यक्रम न घेता रक्तदान शिबिर आयोजन करून एक आगळा वेगळा पायंडा अमनवाडी येथील नवदुर्गा उत्सव मंडळ यांच्या वतीने पार पाडला यावेळी रक्तदान शिबिराला जऊळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे मालेगाव तहसीलदार रवी काळे साहेब यांनी प्रमुख उपस्थिती देऊन रक्तदान करते व मंडळाचे प्रोत्साहन वाढविले रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असून आजच्या काळात सर्व तरुण मंडळींनी स्वतः येऊन रक्तदान करून गरज असणाऱ्या रुग्णांचा जीव वाचविण्यात महत्वाचा वाटा उचलावा व आपले सामाजिक कर्तव्य पार पाडावे असे ठाणेदार आदिनाथ मोरे यांनी उपस्थित मंडळाच्या कार्यकर्त्यांना रक्तदान शिबिर आयोजन संदर्भात संबोधित केले यावेळी रक्त संकलन अधिकारी डॉक्टर प्रणव वाकोडे डॉक्टर विरेन अग्रवाल आधी परिचालक सतीश कुरतवाढ परिचर संतोष शिरसाठ वाहन चालक रुपेश रुपेश तायडे अमानवाडी येथील नवदुर्गा उत्सव मंडळातील सर्व कार्यकर्ते बजरंग दल व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.


