पवनसिंग तोडावत
ग्रामिण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड : राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने तेलंगना राज्यात विक्री होत असलेले मात्र महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या मध्यसाठ्यावर कारवाई करून दहा लाखा पेक्षा जास्त किंमतीचा दारू साठा जप्त केला आहे. बऱ्याच वर्षानंतर ही मोठी कारवाई झाल्याचा चर्चेला कन्नड तालुक्यात उधाण आले आहे.राज्य उत्पादन शुल्क विभाग सिल्लोड व भरारी पथक औरंगाबाद यांनां मिळालेल्या खात्रीलायक गुप्त माहिती नुसार कन्नड येथील मक्रनपुर तौसिफ शेख सिराज याच्या राहत्या घरी छापा मारला असता विविध नामांकित कंपन्याचे एकूण 77 मध्य साठयाचे बॉक्स किंमत दहा लाख एकसष्ट हजार रु किमतीची असून मुद्देमालसह आरोपी तौसिफ शेख सिराज यास अटक करण्यात आली आहे. सदरील कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क सिल्लोडचे निरीक्षक विजय रोकडे व भरारी पथक औरंगाबाद यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. कन्नड तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री होते. मात्र याकडे उत्पादन शुल्क विभागाचा सरसिपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. निरीक्षक विजय रोकडे,स.दु.नि.प्रवीण पुरी व रवींद्र मूरडकर यांनी विशेष कामगिरी बजावत आरोपीकडून मोठा मद्यसाठा जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप संचालक उषा वर्मा विभागीय उपआयुक्त सुधाकर कदम याच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली. दुय्यम निरीक्षक रमेश विठोरे,शरद रोटे,शाहु घुले, राजेश धनवटे, स.दु नि. प्रवीण पुरी,रवींद्र सुरडकर, सुभाष गुंजाळे, किशोर ढाले, युवराज गुंजाळ, मयूर जैस्वाल, निखील काकडे, शारेक कादरी,धनंजय डिडुळ व वाहन चालक संजय गायकवाड यांनी सदरील कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. पुढील तपास निरीक्षक विजय रोकडे हे करत आहे.

