गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:- तेल्हारा येथील पुरुषोत्तम पांडुरंग इंगळे या माथेफिरू इसमाने ह भ प श्री विठोबा महाराजांना केलेल्या महाराणी बद्दल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी सर्व भाविक भक्तांनी तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांना निवेदन देऊन केली तसेच या घटनेच्या निषेधार्थ १२ ऑक्टोबरला तेल्हारा बंदचे आवाहन करण्यात आले. भाविक भक्तांनी आपल्या निवेदनात म्हटले की पुरुषोत्तम पांडुरंग इंगळे या माथेफिरू इसमाने दिनांक १० , १० , २०२१ रविवार रोजी केशव नथुजी खोटरे यांच्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा ठेवली म्हणून सदर पूजेसाठी सर्वांचे आराध्य दैवत असलेले हरीभक्त पारायण श्री विठोबा महाराज यांना त्यांनी घरी बोलावले असता खोटरे यांच्या घरातील पूजा आटोपल्यानंतर हार्वेस्टर ची पूजा आटोपल्या नंतर श्री विठोबा महाराज घराबाहेर आले असता पूजन केल्यानंतर अचानक पणे पुरुषोत्तम पांडुरंग इंगळे या माथेफिरू इसमाने अनिल अग्रवाल यांनी माझे घर जनता बँकेने जप्त केले ते मोकळे करून द्या असे म्हणत ह भ प श्री विठोबा महाराज यांना थापड़ा बुक्यानी मारहाण करून अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करून लोटपाट केली हा सर्व प्रकार निंदनीय आहे .हरी भक्त पारायण श्री विठोबा महाराज पंचक्रोशीतले मोठे आमचे दैवत असून त्यांना मानणारे खूप लोक आहेत महाराजांना काही कारण नसताना पुरुषोत्तम इंगळे या इसमाने मारहाण करून हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या त्यांचा अपमान केला हरिभक्त परायण विठोबा महाराज हे दत्त मार्गी असून त्यांचे पुरुषोत्तम इंगळे या माथेफिरूच्या वाईट कृत्यामुळे समस्त हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या असून धर्माचा अपमान झाला आहे या माथेफिरूने महाराजांना जीवे मारण्याची धमकी दिली या सर्व प्रकारा मुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे महाराजांना शिवीगाळ करणे मारहाण करणे जीवे मारण्याची धमकी देणे अशाप्रकारचे कृत्य सदर माथेफिरू इसमाने केल्यामुळे त्या इसमास तात्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी तसेच सदर इसम गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याला तडीपार करण्यात यावी अशी सुद्धा मांगनी करण्यात आली व विठोबा महाराज यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ 12 ऑक्टोबरला तेल्हारा बंदचे आव्हान भाविक भक्तांनी केले आहे.