संजय चिंतामणी
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ : गांधी जयंती निमित्याने “महागाव शहरात”संत नरहरी सोनार व्यापारी संघटनेच्या सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबविली, महागाव शहर सध्या”कचऱ्याच्या ढिगाऱ्याने आणि दुर्गंधीने वेढलेले आहे. सोनार लाइन समोरील पंचायत समिती गेट समोरच सर्व लोकं गेल्या कित्येक दिवसांपासून कचरा टाकीत आहेत.नगरपंचायत चा कार्यकाळ संपल्यामुळे सध्या घंटागाडी बंद आहे, त्यामुळें सर्विकडे शहरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे, सध्या सर्वत्र मलेरिया, टायफाईड आणि डेंग्यू सारख्या डासापासून निर्माण होणाऱ्या आजाराचे थैमान सुरू आहे. अश्यातच हे घाणीचे साम्राज्य. सर्व सामान्य जनतेला मरणाच्या तोंडी देण्यास प्रशासनाच्या ढिसाळ कारभार जबाबदार आहे. स्टेट बँक परिसरात तालुक्यातील सर्व लोकांचा वावर असतो, तिथेही सर्वत्र घाण बघावयास मिळते. शहरातील सर्व नाल्या योग्य रित्या बांधल्या गेल्या नसल्यामुळे पावसाळ्यात नाल्या तुंबून राहतात, त्यामुळें तिथे डासाची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होतें.तहसीलदार साहेबांनी किंवा एस.डी.ओ साहेबांनी त्वरित महागाव शहरातील विवीध समस्येवर मार्ग काढावा. ही आम्हा सर्व गावकऱ्यांची आणि व्यापारी वर्गाची मागणी आहे. स्वच्छता अभियानात सोनार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय चिंतामणी. सचिव राजेश माळवे. आणि राजेश दारर्व्हेकर, कैलास रोडे. प्रमोद रोडे, इत्यादी सोनार बंधूनी भाग घेतला.


