शेख अकिल
शहर प्रतिनिधी
चिखली- आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त इंदिरानगर येथे चिखली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मतदान नोंदणी अभियान राबविण्यात आले. सदर कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना पुष्पगुच्छ अर्पण करून झाली. या कार्यक्रमात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्यावर भाषण वक्तव्य करण्यात आले. बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांच्या आदेशानुसार मतदान नोंदणीअभियान सुरु करण्यात आले. सदर कार्यक्रमात नगरपरिषद गटनेते मोहम्मद आसिफ, माजी नगरसेवक विलास कंटुले ,थोरात साहेब ,प्रदीप पचेरवाल, शेख जाकीर, फिरोज खान, मोहम्मद सोहेल, शेख अफजल,काझी भाई तसेच अनेक नवयुवक उपस्थित होते.











