सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
श्री प. दि. जैन कला महाविद्यालय, अनसिंग जि. वाशिम राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक 2 ऑक्टोबर 2021रोजी सकाळी 9.00 वा. महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने विशेष व्याख्यान आयोजित केले होते सदर व्याख्यान गुगल मिटवर ऑनलाइन पद्धतीने होते सदर व्याख्यानाला उपस्थित राहून उपकृत करावे अशी नम्र विनंती विद्यालयाकडून करण्यात आली कार्यक्रमाचा विषय गांधी नावाचा शुर माणूस होता कार्यक्रमात प्रमुख वक्ते यांनी गांधीजींच्या जीवनावर प्रकाश टाकून गांधीजींचे विचार व त्यांची जीवनशैली अंगिसात करावी यावर भर दिला कार्यक्रमाचे अध्यक्ष.प्राचार्य डॉ. विवेक गुल्हाने होते कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते -डॉ. टि. डी. राजगुरे( इण्णानी महाविद्यालय,कारंजा लाड) तर विनीत प्रा. सचितानंद बिचेवार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी होते