सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर सोमवार दि 20 ला रिठद येथे सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून शेतकरी, शेतमजूर आणि सर्व सामान्यांना खुप अपेक्षा आहेत. शेतकऱ्यां पुढील समस्येची सोडवणूक व भूमिपुत्र शेतकरी संघटनेची भविष्यातील वाटचाल हि कार्यकर्त्यांवर अवलंबून आसणार आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार यानी सांगीतले. प्रशिक्षण शिबीराची सुरूवात सकाळी 10.30 वा. शिवाजी हायस्कूल येथे डॉ. जितेंद्र गवळी यांच्या प्रास्ताविकांने सुरू होणार आहे. शिबिरात प्राचार्य डॉ. विजय तुरूकमाने हे पहिल्या सत्रात ‘शेतकरी समाज व शिक्षण’ या विषयावर बोलणार आहेत. मा. संजयजी मालोकार अकोला हे ‘किसान क्रेडिट कार्ड चे महत्त्व व गरज’ हा विषय घेणार आहेत. दुसरे सत्रात पीएमपी हर्बल अॅड अँग्रो सर्व्हीसेस अकोला चे संस्थापक मा. पंकज पाटील हे ‘लसुण लागवडीतुन समृद्धी’ या विषयावर बोलणार आहेत. हिंगोली येथील तज्ञ प्रा. देवराव थेटे सर ‘शेतकऱ्यांचे अर्थिक नियोजन’ हा विषय घेणार आहेत. तिसरे व अंतिम सत्रात मा. गजानन आमदाबादकर हे ‘शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता’ या विषयावर बोलणार आहेत. भूमिपुत्र चे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांचे अध्यक्षीय भाषणाने शिबिराचा समारोप होईल. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयोजक उत्तमराव आरू हे करणार आहेत. तर सुत्र संचालन देव इंगोले करणार आसल्याचे भूमिपुत्र चे जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार यांनी सांगीतले.











