पूर्व मंडळात महाआरती व सन्मानपत्र वाटप कार्यक्रम संपन्न
अभिजीत फंडाट ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळाच्यावतीने माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे ,आमदार गोवर्धन शर्मा ,आमदार रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल ,महापौर सौ अर्चनाताई मसने, महानगर सरचिटणीस संजय गोडा, श्री अक्षय गंगाखेडकर, डॉक्टर विनोद बोर्डे , संजय जिरापुरे, संजय गोटेफोडे,जिल्हा सरचिटणीस माधवराव मानकर , योगेश मानकर,पूर्व मंडळ अध्यक्ष ऍड देवाशिष काकड यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री लंबोदर गणेशोत्सव मंडळ, व मराठा नगर, गडडम प्लॉट येथे गणेशोत्सव मंडळांना पूर्व मंडळा कडून सन्मानपत्र वाटप कार्यक्रम आ श्री रणधीरभाऊ सावरकर व विजय अग्रवाल व सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला आ. रणधीर सावरकर यांनी युवकांना या प्रसंगी मार्गदर्शन केले व युवक हा बलशाली भारताचा भाग्यविधाता असून, आजची तरुण पिढीच्या सामर्थ्यशाली भारत घडविण्यासाठी सक्षम असून त्यांच्या खांद्यावर आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्याची महत्वपूर्ण जवाबदारी आहे , युवकांनी गणेशोत्सव मंडळांद्वारे लोकाभिमुख कार्यक्रम व जनजागृती वर भर द्यावा असे या प्रसंगी आ सावरकर यांनी आवाहन केले.
महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी युवकांनी या करोना काळात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व मनोभावे श्रीगणेशाची स्थापना करणाऱ्या व सर्व नियमांचे पालन करून लोकाभिमुख कार्यक्रम घेणाऱ्या गणेश मंडळांचे कौतुक केले व युवा पिढीचे अभिनंदन केले.
या प्रसंगी नगरसेविका सौ गीतांजली शेगोकार, नगरसेवक हरीश काळे, नगरसेविका सौ सारिका जयस्वाल ,सौ आरती घोगलिया, गटनेते श्री राहुल देशमुख, पूर्व मंडळ महिला आघाडी अध्यक्षा सौ निकिता देशमुख, सागर शेगोकार, प्रशांत अवचार, प्रकाश घोगलिया, रुपेश जयस्वाल,मोहन पारधी, अक्षय जोशी पूर्व मंडळ सरचिटणीस संदीप गावंडे, आकाश ठाकरे, अभिजित कडू, पूर्व मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष केशवजी हेडा, शुभम चंदन , यश अग्रवाल, अमित चाळीसगावकर, कृष्णा सोनटक्के, हेमेन्द्र सुनारीवाल, अतुल अग्रवाल,सर्व मंडळ पदाधिकारी, सन्माननीय नगरसेवक व भाजपा कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते