सादिक शाह
सर्कल प्रतिनिधी रायपुर
बुलढाणा. राजर्षी शाहू चॅरीटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलडाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पळसखेड भट शाळेच्या वतीने रायपुर येथील हिंदू स्मशान भूमी मध्ये भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. संदीप शेळके अध्यक्ष राजर्षी शाहू चॅरीटेबल ट्रस्ट तर प्रमुख अतिथी म्हणुन राजवंत आठवले, ठाणेदार रायपूर पोलीस स्टेशन तसेच प्रमुख उपस्थिती .सुनील देशमाने ग्रा. पं. सदस्य, बालाप्रसाद जैस्वाल, मा. चांदभाई मुजावर प.स.सदस्य, अस्लमभाई पठाण उपसरपंच पिंपळगाव सराई, सज्जादभाई उपसरपंच रायपूर, शमीम सौदागर, ज्ञानदेव सोनुने, अफसर भाई, देविदास सिरसाट, तसेच पत्रकार संजय सोळंके, राजर्षी शाहू बँक चे सरव्यवस्थापक भागवत गव्हाणे, विभागीय व्यवस्थापक सुशील गुळवे स्थानिक शाखा व्यवस्थापक सुभाष फोलाने यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते वृक्षपुजन करण्यात आले. तद्नंतर सर्व मान्यवरांचे वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. लावलेल्या झाडांमध्ये चिंच, शिवणी, पारस पिंपळ, कद्दू, आभेटा, करंज, गुलमोहर, कडू निंब, मोह, उंबर, जांभूळ, अश्या प्रकारे विद्यार्थी व सर्व मान्यवर मिळून एकूण 210 वृक्ष लागवड करण्यात आल व संगोपनाचा संकल्प करण्यात आला. प्रास्ताविक पर भाषणात पर्यावरणाबाबत “समृध्द पर्यावरण, समृध्द जीवन” या हेतूने वागत आपला “ग्रीन स्कूल”, हा संकल्प कायम ठेऊन जिजाऊ ज्ञान मंदिर बऱ्याच वर्षांपासून पर्यावरण वाढीस हात भार लावत आहे. याचं माध्यमातून विविध ठिकाणी वृक्ष रोपनाचा संकल्प शाळेने केला असून, त्याचाच एक भाग म्हणून शिक्षण विभागाच्या मदतीने व रायपूर ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने रायपूर “हिंदू स्मशानभूमी”येथे भव्य वृक्षारोपण करीत आहोत. असे प्रास्ताविक पर भाषणात शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट म्हणाले. अतिथीय भाषणात ठाणेदार राजवंत आठवले म्हणाले की, गेल्या कोरोना काळामध्ये लोकांना लाखो रुपये खर्च करून सुद्धा ऑक्सिजन मिळाला नाही. त्यामुळे वृक्ष सवर्धन ही काळाची गरज आहे. आपण लावलेल्या 210 वृक्षांमधून जवळपास 22 कोटी किलो ऑक्सिजन मिळू शकतो. असाच विचार प्रत्येकांनी केला तर पर्यावरण समृध्द होईल आणि केवळ झाडे लावून उपयोग नाही. तर संगोपन व सवर्धन करणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. अशा सुचना त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. तर अध्यक्षीय भाषणामध्ये वृक्षांना नावे देऊन नियमित संगोपन झाले पाहिजे. तसेच संस्थेच्या माध्यमातून आपण दरवर्षी एक लक्ष वृक्ष लागवड करीत असतो. आणि केवळ वृक्ष लागवडच नाही तर वृक्ष वाढीपर्यंत त्याची काळजी घेतल्याशिवाय संस्थेतील कर्मचाऱ्यांचे वेतन वाढ करीत नाही. अशा प्रकारे पर्यावरणास हात भार लावला तर जागतिक तापमान वाढ नियंत्रण व पर्यावरण संतुलनास मदत होईल. याचाच भाग म्हणून जिजाऊ ज्ञान मंदिर मध्ये “माझा वाढदिवस माझे झाड” हा उपक्रम राबवला जातो. या माध्यमातून शाळेला ग्रीन स्कूल म्हणून नवी ओळख मिळत आहे, याचा आनंद आहे. असे संस्थेचे अध्यक्ष मा. संदीपदादा शेळके म्हणाले.कार्यक्रमासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य रायपूर यांची उपस्थिती लाभली. व या भव्य वृक्षारोपणासाठी गटशिक्षणाधिकारी मा. पवार सर यांनी शुभेच्छा दिल्या. व शाळेचे विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे
सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश खिल्लारे यांनी केले.
कार्यक्रमाची काही क्षणचित्रे.