शेख अकील
शहर प्रतिनिधी चिखली
चिखली : आनंद नगर वार्ड क्र. १९ मधील ‘बजरंगी ग्रुप’ हा गणपती विसर्जनाचा केंद्रबिंदु मानला जातो. दरवर्षी प्रमाने यंदाही गणेशाची स्थापना जे. सी. बी. वर करण्यात आली होती आणि विसर्जनही देखिल जे. सी. बी. वरच करण्यात आले . शासनाने दिलेल्या नियमांचा काटेकोरपने पालन करत गणपतीची स्थापना करण्यात आली होती, कोरोनाचा प्राधुर्भाव पाहता गतवर्षाचा भंडारा देखील रद्द करण्यात आला. पर्यावरणाचा भान ठेवत विसर्जन हा कृत्रिम पद्धतिने करण्यात आला , यावेडी विसर्जन कार्यक्रमाला आनंद नगर वार्ड नं.१९ चे नगरसेवक संजय अत्तार तसेच चंद्रकांत जेठे, माधव जेठें, राजू कुसडकर व वार्डमधिल वडर बांधव उपस्थित होते. ” गणपती बप्पा मोरया अगले बरस तू जल्दी आ” या घोषणेने पुर्ण वार्ड दणाणले.