सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर – येथील श्रीक्षेत्र ज्ञानमंदिरात १८ सप्टेंबर रोजी झालेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रारंभी पीठाधीश सद्गुरु ॲड.रंगनाथ महाराज पितळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ.चव्हाण, डॉ.मोरे उपस्थित होते.
नृसिंह प्रतिष्ठान या संघटनेतर्फे गणेशोत्सवा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबाद येथील दत्ताजी भाले रक्तपेढीच्या चमूने रक्ताचे संकलन केले. ज्ञानमंदिराच्या सभागृहात झालेल्या या शिबिरात मेहकर शहरातील ७० नागरिकांनी रक्तदान केले. उद्घाटनप्रसंगी अॕड.पितळे महाराज, डॉ.चव्हाण, डॉ.मोरे यांचा नृसिंह प्रतिष्ठानच्या वतीने शाल–श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अॕड.पितळे महाराज यांनी, नृसिंह प्रतिष्ठानच्या तरुण कार्यकर्त्यांनी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, पूरग्रस्तांना मदत, पर्यावरण जागृती यासोबतच रक्तदान शिबिर घेणे हे कौतुकास्पद आहे. यामुळे कोरोनाच्या आपत्तीमुळे निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यात मदत होईल, अशी भावना व्यक्त केली. शिबिराच्या यशस्वितेसाठी नृसिंह प्रतिष्ठानचे विठ्ठल बोरकर, विनीत कुळकर्णी, हिंमत आसोले, समीर कुळकर्णी, ऋषिकेश जोशी, ऋषी सराटे, वैभव लाडसावंगीकर, अथर्व जीवने, नयन देशमाने, वैभव दायजे यांनी परिश्रम घेतले.