अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगाव
मालेगाव कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून, गणेश उत्सव काळात गर्दी टाळण्यासाठी आपापल्या गावात पोलिस पाटील यांनी “एक गाव एक गणपती” बसविण्यासाठी प्रयत्न करावेत.असे आवाहन ता. 8 रोजी पोलिस स्टेशन अंतर्गत 34 गावातील पोलिस पाटील यांच्याशी बोलताना नवनियुक्त ठाणेदार प्रविण धुमाळ यांनी केले.पुढे बोलताना ठाणेदार असेही म्हणाले की,जे पोलिस पाटील “एक गाव एक गणपती” व सामाजिक आणि आरोग्य विषयक उपक्रम, राबवेल अशा गावातील पोलिस पाटलांचे नांव पुरस्कारासाठी शिफारस केली जाईल. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली असली तरीही, तिसरी लाट येऊ घातली आहे.ती लाट जास्त धोकादायक आहे.म्हणून गावातील लोकांचे आरोग्य विषयक प्रबोधन करण्यासाठी, जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी “एक गाव एक गणपती” या उपक्रमासाठी गावकऱ्यांना आवाहन सुद्धा केले.तसेच गणपती उत्सव काळात गावात लसीकरण शिबीराचे आयोजन, आरोग्य विषयक शिबीर व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. उत्सव काळात गावात कोणतीही अनुचित घटना घडू नये.व सर्व कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग चे पालन करून साजरे करावेत. आणि पोलिस पाटील यांनी संपूर्ण उत्सव काळात जास्त दक्ष राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन विष्णू मुसळे यांनी तर आभार पुष्पलता वाघ यांनी मानले. ठाणेदार प्रविण धुमाळ यांनी मार्गदर्शन केले


