सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम – शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी आंदोलनाची भूमिका घेणार्या ‘भूमिपुत्र’ शेतकरी संघटनेच्या वतीने रविवार, २९ ऑगष्ट रोजी स्थानिक अकोला नाका येथील शिवनेरी संकुलातील संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार कृतज्ञता सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोरोना महामारीमध्ये संपूर्ण जग लॉकडाऊन असतांना सर्वसामान्यांना माहिती पुरविण्यासाठी अहोरात्र झटणार्या समस्त पत्रकार बांधवांप्रती कृतज्ञता म्हणून पत्रकारांचा उचित सन्मान यावेळी केला गेला. याप्रसंगी आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूपंत भुतेकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, जिल्हा प्रवक्ते देव इंगोले, वाशिम तालुकाध्यक्ष संतोष सुर्वे, सहयोगी सदस्य शिवाजीराव वाटाणे, मार्गदर्शक भागवतराव गोटे यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार विश्वनाथ राऊत, नंदू शिंदे, प्रांजल जैन, बाळासाहेब देशमुख, अतिष देशमुख, नीलेश सोमानी, गजानन भोयर, मंकेश माळी, विठ्ठल देशमुख, गणेश भालेराव, अजय ढवळे, गणेश मोहळे, गजानन देशमुख, साजन धाबे, विशाल राउत, ज्ञानेश्वर कव्हर,पंकज गाडेकर, गोपाल व्यास, नाझीर खान, राम धनगर, रितीश देशमुख, संदेश बांडे, संदीप डोंगरे, यांचा सत्कार संघटनेच्यावतीने करण्यात आला.लोकशाहीचा चवथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांचे महत्व व योगदान समाज व राष्ट्राच्या विकासासाठी अनन्यसाधारण आहे. कोरोना काळामध्ये अनेक पत्रकारांनी आपल्या घरावर तुळशिपत्र ठेवून अमुल्य अशी पत्रकारीता केली आहे. या सर्व पत्रकारांप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्र संचलन महावीर पवार यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका सचिव सतिश गंगावणे, युवक जिल्हाउपाध्यक्ष सचिन काकडे, रवि पाटील जाधव, मालेगाव युवक तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर सोमटकर व छत्रुघ्न बालाजी गोटे, गोपाल दांदडे, अवचार यांनी परिश्रम घेतले.