गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : आगामी तेल्हारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीची समर्थ बुथ अभियान या करिता शक्ती केंद्र प्रमुख बुथ प्रमुख यांचीआढावा बैठक आज स्थानिक माहेश्वरी भवन येथे पार पडली सदर बैठकीला प्रमुख उपस्थिती प्रदेश कार्यकारणी सदस्य तेजराव पाटील थोरात यांनी आगामी नगरपालिका निवडणूक भारतीय जनता पार्टी 17 ही जागा स्वबळावर लढवणार असल्याचे बोलले त्यानुषंगाने पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे त्यांनी सांगितले. तेल्हारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पूर्वतयारी म्हणून आज भारतीय जनता पार्टीची शक्ती केंद्र प्रमुख बुथ प्रमुख कार्यकर्त्यांची यांची आढावा बैठक पार पडली या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष तेजराव पाटील थोरात यांनी कार्यकर्त्यांना जोमाने कामा करीत आगामी निवडणूक भारतीय जनता पार्टी स्वबळावर 17 ही जागा लढत असल्याचे सांगताच कार्यकर्त्यांनीही त्याचे उस्फुर्त स्वागत करून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सदर बाबीचे उस्फुर्त स्वागत केले. तेल्हारा नगरपालिकेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात पालिकेने आज पर्यंत नव्हे इतका मोठा निधी भारतीय जनता पार्टीच्या सत्तेत खेचून आणून विकास कामे केली तसेच आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या विशेष प्रयत्नाने तेल्हारा नगरपालिकेत सदर निधी आला मात्र सदर विकासकामांचे प्रकाशन किंवा नागरिकांन पर्यंत विषय मांडायला कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रेरित केले.आमदार प्रकाश भारसाकळे यांनी तालुक्यातील चार ही रत्यासाठी भरहोष निधी खेचून आनला यात आता ठेकेदार काम करत नसल्याने आमदाराचा दोष काय असा प्रश्न ? ही उपस्थित केला.या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा सरचिटणीस माधवराव मानकर ,केशवराव ताथोड तालुकाध्यक्ष गजानन उंबरकर शहराध्यक्ष महेंद्रजी गोयनका नगराध्यक्ष सौ जयश्री पुंडकर जिल्हा सचिव डॉ. संजय शर्मा , प्रदेश महिला उपाध्यक्ष नयना मनतकार , जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणे , नगरसेवक अनुप पाटील मार्के, सुनील राठोड, मंगेश सोळंके, भाजयुमो मोर्चा सरचिटणीस किरण अवताडे, शहराध्यक्ष गणेश इंगोले, तालुका सरचिटणीस धर्मेश चौधरी, सरचिटणीस सतीश जैस्वाल ,रवी गाडोदिया ,विजय देशमुख, डॉ ऋषिकेश चोपडे ,बाळकृष्ण पवार, सुमित गंबिरे विलास पात्थीकर, गजानन नळकांडे, राहुल झापर्डे, प्रकाश शर्मा, नारायण भोयर, राजेश पालिवाल, सुरेंद्र जोशी, अतुल विखे, भरत जोशी अब्दुल मतिन,ऋषिकेश ठाकूर बबलू सरोदे, शिवा खाडे, विशाल कोकाटे, राजेश छांगाणी , बाळू तीवाने ,प्रमोद सोनटक्के सुनील भुलबुले ,रवी शर्मा, सलीम शहा देवीलाल गव्हाणे, प्रमोद सोनटक्के , दिनेश गोयल ,नागोराव वानखडे, कैलास भटकर, या सह शक्ती केद्रं प्रमुख बुथ प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचा
- मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणी जलदगतीने व पारदर्शक पध्दतीने करण्यात यावी – जिल्हाधिकारी गोविंद बोडके
- पावणे तीन लाखांचा बिअर साठा जप्त, राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पथकाची बेधडक कारवाई…..
- लोकाश्रयातून ज्ञान मंदिरांचा विकास व्हावा – डॉ कोठेकर
- सात वर्षांनी तो अचानक परतला अन् आईचे अश्रू अनावर…
- शिष्यवृत्ती परीक्षेत विटा -१ शाळेचे घवघवीत यश