महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.२९ : भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हा महामंत्री पदी भद्रावती येथील युवा कार्यकर्ते इम्रान खान यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. इम्रान खान यांनी गेल्या वर्षभरात भद्रावती तालुक्यामध्ये युवकांत भाजपचा विचार रूजवत संगटनविस्तारासह कोविड काळात केलेल्या कार्याची दखल घेऊन भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी जिल्हा उपाध्यक्ष असलेल्या इम्रान खान यांना महामंत्री पदी बढती दिली आहे. खान यांच्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्राचे लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजभैय्या अहीर, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे, आ. बंटीभाऊ भांगडिया, माजी जिल्हाध्यक्ष हरीषजी शर्मा, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, माजी आमदार संजयजी धोटे, माजी आमदार अतुलभाऊ देशकर, माजी आमदार सुदर्शनजी निमकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, सोपान कनेरकर,रघूविर अहीर,विवेक बोढे,अनिल डोंगरे,वरोऱ्याचे नगराध्यक्ष अहेतेश्याम अली, जेष्ठ नेते बाबा भागडे, चंद्रकांत गुंडावार,नरेद्र जिवतोडे,कीशोर गोवारदीपे,प्रवीण ठेंगणे,अफजल भाई,प्रशांत डाखरे,अमित गुंडावार,जि.प.सदस्या अर्चना जिवतोडे,प्रवीण सुर,यशवंत वाघ,मारोती गायकवाड़, महेश टोंगे,विजय वानखेडे,माजी सभापती विदया कांबळे, प्रणिता शेडें, लता भोयर आदिंनी इम्रान खान यांचे अभिनंदन केले आहे. यासोबतच पक्षसंघटनेत पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.