सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : रविवारला एम.ई.एस.कला व वाणिज्य महाविद्यालय येथे क्रिडा दिन साजरा करण्यात आला. भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमीत्त संपूर्ण देशभरात क्रिडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.एम.ई.एस.कला व वाणिज्य महाविद्यालय व क्रिडाभारती यांच्या संयुक्त विद्यमाने सदर क्रिडा दिनाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.गणेश परिहार सर तर प्रमुख उपस्थितीत एम.ई.एस.फाॅर्मसी काॅलेजचे प्राचार्य सुधीर मूळे व क्रिडाभारतीचे मेहकर तालुका अध्यक्ष डाॅ. मोहन राजदेरकर हजर होते.कार्यक्रमाची सुरुवातीला मान्यंवरानी माता सरस्वती व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले.क्रिडा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी व पाॅवर लिफ्टिंग मध्ये राज्यस्तरावर प्राविण्य मिळवणारा राजेश रोकडे यास Tracksuit देऊन गौरविण्यात आले.अध्यक्षांनी आपल्या भाषणातून मेजर ध्यानचंद यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला. तर प्रमुख पाहुण्यांनी क्रिडा दिनाचे महत्व विशद केले.सदर कार्यक्रमामध्ये क्रिडाभारतीचे माजी विदर्भ प्रांत संयोजक स्व.काणे सर यांना श्रध्दांजली देण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन प्रा.गणेश सावजी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. प्रविण जोशी यांनी केले.कार्यक्रमास प्रा.डाॅ.दांदडे सर,महाविद्यालयाचे शारिरीक संचालक प्रा..डाॅ.हुंबाड सर,एम.ई.एस.हायस्कूलचे क्रिडाशिक्षक मोहरील सर,क्रिडाभारतीचे तालुका उपाध्यक्ष शैलेश बावणे,संजय बोरकर,संतोष सारडा,राजा चापे,दिनेश,मधुकर भड इ.उपस्थिती होती.











