जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातूर : सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये संशोधनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील संशोधन हे समाजाला उपयुक्त असावे असे प्रतिपादन उच्च शिक्षण, नांदेड विभाग, नांदेडचे सहसंचालक डॉ.विठ्ठल मोरे यांनी केले. येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये ते मार्गदर्शन करतांना बोलत होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे यांनी त्यांचा शाल, जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला.यावेळी स्वा.रा.ती.म.विद्यापीठ नांदेडचे सिनेट सदस्य डॉ.अशोक मोटे, डॉ.दीपक चाटे, डॉ.प्रकाश शिंदे, स्टाफ सचिव कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले, डॉ.दिनेश मौने, डॉ.संजय गवई, डॉ.यशवंत वळवी, प्रा.गुणवंत बिरादार आणि कलापंढरी संस्थेचे अध्यक्ष बी.पी.सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना डॉ.विठ्ठल मोरे म्हणाले की, आमच्या शैक्षणिक कालखंडामध्ये संशोधन मार्गदर्शक व संशोधक विद्यार्थी यांचे एक सौदार्यपूर्व नाते होते. संशोधक आणि विद्यार्थी यांच्या शैक्षणिक संशोधनामध्ये गुणात्मकता होती. कुठल्याही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक विकासामध्ये शिक्षकाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते तसेच ती समाजाला सुद्धा एक विधायक दिशा देणारी असते असेही ते म्हणाले.या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे म्हणाले की, महाविद्यालयाचा शैक्षणिक विकास हे एक टीम वर्क आहे यामध्ये प्रत्येकाने सोपविलेल्या जबाबदाऱ्या जाणीवपूर्वक पार पाडल्या तर त्या महाविद्यालयाचा विकास हा लोकशाही पद्धतीने जलद गतीने घडून येतो.यावेळी स्वा.रा.ती.म.विद्यापीठ नांदेडचे सिनेट सदस्य डॉ.अशोक मोटे, डॉ.दीपक चाटे, डॉ.प्रकाश शिंदे आणि कलापंढरी संस्थेचे अध्यक्ष बी.पी.सूर्यवंशी यांचाही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संजय गवई यांनी केले तर आभार डॉ.यशवंत वळवी यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेश वाडकर, कृष्णा कोळी, शुभम बिरादार, बालाजी होनराव यांनी परिश्रम घेतले.