वृषभ दरोडे
राळेगाव तालुका प्रतिनिधी
राळेगाव : तालुकांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वरील ‘वडकी’ येथील नामांकित डॉ. सुरेंद्र ठमके यांनी आज रविवार दि. २९ ऑगष्ट २०२१ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास वडकी जवळील वर्धा नदीच्या पुलावरून १०० फूट उंचीवरून नदीपात्रात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक व दु:खद घटना घडली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, वडकी येथील परिसरात परिसरात नामांकित व प्रसिद्ध असलेले डॉ. सुरेंद्र ठमके यांचा २० ते २५ वर्षापासून दवाखाना सुरु होता. ते रात्रंदिवस परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास सदैव तत्पर असायचे. अशातच त्यांनी फायनंन्स कंपणीकडून कर्ज घेतल्याचेही समजते. मात्र कर्जाची परतफेड करणे अवघड झाल्याने त्यांच्या मनावर विपरीत परिणाम झाला असल्याची गावकऱ्यात चर्चा आहे. या कर्जापोटी माझे राहते घर जाणार तर नाही ना? याच विवंचनेत नेहमी असायचे. याच कर्जाचा धसका घेतल्यामुळे आज रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास वर्धा नदीच्या पात्रात १०० फुट उंच असलेल्या पुलावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली.सदर घटनेची परिसरात वाऱ्यासारखी माहिती पसरताच घटनास्थळी वर्धा नदीच्या पुलावर हजारोच्या संख्येने नागरिकांची गर्दी जमली होती. सर्वत्र शोधाशोध सुरू असतांना पुलापासून २ किलोमीटर अंतरावरील असलेल्या एका झाडाला त्यांचा मृतदेह अडकून पडलेला आढळला. नदीपात्रातून भोई समाजाच्या लोकांनी ट्यूब च्या सहाय्याने दोन ते तीन तासांच्या अथक परिश्रमाने पोलिसांच्या समक्ष मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.वडकी पोलिसांनी घटनास्थळी पंचासमक्ष मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालय राळेगाव येथे पाठविण्यात आला आहे. डॉ सुरेंद्र ठमके यांच्या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून त्यांनी नेमकी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या का केली? आत्महत्येस कोणी प्रवृत्त केले काय? याचाही उलघडा पोलीस तपासात उघड होणारच आहे. त्यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्यापही स्पष्ट झाले नसून या घटनेचा पुढील तपास वडकी पोलीस स्टेशन चे ठाणेदार करीत आहे. डॉ. सुरेंद्र ठमके यांच्या पश्चात पत्नी दोन मूले असा आप्त परिवार आहे, यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.