अजिंक्य मेडशिकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार हमी योजनेतुन समृद्ध महाराष्ट्र व प्रत्येक गावात प्रत्येकाला काम मिळण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गाव पातळीवर सर्वाना काम मिळणार आहे. यासाठी आपल्या ग्रामपंचायत ग्रामसेवक, ग्राम रोजगार यांच्या कडे आपन रोजगार हमी योजनेतुन काम करण्यासाठी एक अर्ज करून त्याची पावती घ्यायची किंवा रोजगार हमी योजनेतुन एखादे काम मागा काम मागितल्यावर पंधरा दिवसात आपल्याला रोजगार हमी योजनेतुन काम मिळते. या साठी एक मस्टर असते या मध्ये आपल्या रोजच्या कामाची हजेरी व दर आठवड्याला कामाचे मोजमाप करून पंधरा दिवसाच्या आत मजुरी मिळते.
रोजगार हमी योजनेतुन कामाची मजुरी आपल्या खात्यात जमा होते.यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये पण खाते काढून या पोस्ट ऑफिसच्या खात्यात पैसे जमा होतात. रोजगार हमी योजनेतुन वैयक्तिक लाभाचे काम पण मिळु शकतात या मध्ये सिंचन विहीर, घरकुल,रोपवाटिका, शोषखड्डा, फळबाग, शेततळे, शौचालय, वृक्षलागवड, दगडी बांध, कुक्कुटपालन शेड, गोठागोठा आहे भरपूर या रोजगार हमी योजनेतुन आपल्याला कामे व वैयक्तिक लाभ घेऊ शकता या साठी आपण ग्रामपंचायत ग्रामसेवक किंवा रोजगार सेवकाकडे नोंदणी करा. या साठी जाॅब कार्ड असने आवश्यक आहे. यासाठी आपण आपल्या ग्रामपंचायत ग्रामसेवक किंवा रोजगार सेवकांशी संपर्क करा असे आवाहन पंचायत समिती सदस्या श्रीमती कौशल्याबाई रामभाऊ साठे यांनी केले आहे.











