विद्यार्थी नेता मोहम्मद फरहान अमीन यांच्या कार्याला यश
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
डीएड व बीएड अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा शिक्षक पात्रता चाचणी (TET) मध्ये समावेश करावा किंवा २२ ऑगस्टपूर्वी बी. एड विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी नेते मोहम्मद फरहान अमीन यांनी तहसीलदार दीपक बाजड यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महारष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून केली होती.राज्य शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घेण्याचे नियोजन केले आहे, या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट होती, फक्त डी.एड व बी.एड पास विद्यार्थीच परीक्षेसाठी पात्र असतील, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ बी.एड ची परीक्षा १४ ऑगस्ट पर्यंत बाजूने घेण्यात आली होती. २२ ऑगस्टपूर्वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यास विद्यार्थी टीईटी परीक्षा देऊ शकतील, अन्यथा ते परीक्षेपासून वंचित राहतील, त्यामुळे विद्यार्थी नेते फरहान अमीन यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक होण्याची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावतीने बी. एड चा निकाल जाहीर केला आहे आणि आता डी.एड व बी.एड अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षेत (TET) मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ने शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ची तारीख ५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे, ज्यामुळे विद्यार्थी नेते मो फरहान अमीन यांना मोठे यश मिळाले आहे आणि बीएडच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. फरहान अमीन यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.