अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
विषमुक्त शेती अभियान अंतर्गत वाशिम जिल्ह्यात डॉ . पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अकोला व सेवा प्रदाता संस्था सर्ग विकास समिती यांच्या वतीने एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते सदर प्रशिक्षना मध्ये खालील विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले . १) सेद्रिय शेती प्रमाणीकरण व कार्यपध्दती , २) शेतकरी दैनंदिनी व गट स्तरीय दस्तावेज ३) शेतातील किड रोग निरीक्षण व सर्वेक्षण ४) सेंद्रीय पध्दतीने किड रोग व्यवस्थापण ५) वनस्पतीजन्य किटक नाशके इत्यादी, डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत द्वितीय प्रशिक्षण घेण्यात आले.एकूण दहा शेतकरी गटांच्या संयुक्तरित्या प्रशिक्षणाच्या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना प्रोजेक्टर द्वारे पीपीटी दाखवून श्री शंकर शिंदे सर व श्री शिवाजी भारती सर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमाकरिता मास्टर ट्रेनर श्री श्रीकृष्ण शिंदे व श्री संजय मांडवगडे साहेब व श्री हरीश आवचार साहेब यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले तसेच सर्व गटांचे अध्यक्ष व सचिव यांचे सहकार्य लाभले सोबतच कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पंढरीनाथ जैविक शेती मिशन फार्मर प्रोड्युसर कंपनी चे अध्यक्ष श्री पांडुरंग भाऊ राऊत यांनी अथक परिश्रम घेतले .


