अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, पातूर
पातूर: हरितक्रांतीचे प्रणेते स्व वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील डॉ शांतीलाल चव्हाण यांच्या श्री सेवा क्लिनिक खानापूर रोड,पातूर येथे बुधवार दि.१८ ऑगस्ट २०२१ दु.२ ते ६ पर्यंत आरोग्यम हॉस्पिटल अकोला यांच्या विध्यमाने भव्य मोफत अस्थीरोग व हाडांची ठिसुळता तपासणी शिबीराचे आयोजन केलेले असून शिबिरामध्ये अकोला येथील अस्थीरोग विशेष तज्ञ डॉ गौरव मुंदडा एम.एस.(अर्थो) एफ. डी. सी.सी.एफ.एम.आय.एस.एस.एफ. इ.एस.एस हे अस्थीरोग मणक्याचे व जोड प्रत्यारोपण स्पेशालिस्ट हे रुग्णांची तपासणी करतील.तरी पाठीच्या मणक्याचा त्रास,गुडघेदुखी, संधिवात, आमवात, हाडाच्या संबधी सर्व आजारांच्या रुग्णांची तपासणी मोफत करण्यात येईल तरी पातूर ग्रामीण भागातील गरजू रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिबीराचे आयोजक डॉ. शांतीलाल चव्हाण, व रामगोपाल जाधव यांनी केले आहे.


