सोनेराव गायकवाड
तालुका प्रतिनिधी लातुर
लातुर:-लातुर तालुक्यातील गंगापूर येथील जयकिसान उच्च माध्यमिक विद्यालय येथे ७५ वा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण जय किसान उच्च माध्यमिक संस्थेचे अध्यक्ष बलभीम देविदास शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे.या वेळी जयकिसान उच्च माध्यमिक संस्थेचे सचिव डॉ.सतीश कानडे,संस्थेचे सदस्य सुधाकर मींड आदर्श गंगापूर गावचे सरपंच बाबू खंदाडे,उपसरपंच रफिक शेख,ग्रामपंचायत सदस्य गुणवंत वाघे,हनुमंत वाघे,जयकिसान उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य ए.व्ही बिरादार,पर्यवेक्षक टी.बी कोळी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी व विविध संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्थाविक व सुत्रसंचालन प्राध्यापक बी.व्ही लकक्षेटे यांनी केले व आभार पी.यु ढोबळे यांनी मानले आहे.