सामाजिक बांधिलकी जोपासून आजच्या युवकांनी गौरवचा प्रेरणादायी आदर्श घाव्या.
किरण कुमार निमकंडे / अकोला
पातूर : पोलिसांना त्यांचे हक्क मिळवून देणारी व त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पोलिस बॉइज असोसिएशन उभे करण्यात आले आहे. पोलीस भरती मध्ये पोलीसांच्या पाल्यांना 5 टक्के आरक्षण देणारी एकमेव संघटना आहे. दि 15 ऑगस्ट रोजी पातुर घाटाच्या सानिध्यात वसलेल्या धोधानी पर्यटन परिसरात असलेल्या धबधब्या जवळील डोहात काही तरुण पोहण्यासाठी गेले असता त्यापैकी एक तरुण बुडत होता. बुडणाऱ्या युवकाने सर्व कडे मदतीची अपेक्षा केली होती परंतु तेथील उपस्थितीत असलेल्या त्या तरुणाच्या मित्रांनी बघ्याची भूमिका घेतली होती. त्या वेळी च बाजूला झाडा खाली बसलेल्या गौरव सुरेश श्रीनाथ याने तिथ जाऊन बघितले. तेव्हा त्याने हवेने भरलेले टयुब युवकाकडे फेकले परंतु सदर युवकाला ते पकडता आले नाही ते बघताच गौरव ने स्वतः च्या जीवाची पर्वा न करता डोहात उडी घेतली आणि त्या युवकाचे प्राण वाचविले.अश्या उल्लेखनीय कामगिरीची दखल महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन गौरव श्रीनाथ या युवकाचा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार मा.हरिष गवळी साहेब व पोलीस बॉईज विद्यार्थी व युवक आघाडी तर्फे हार व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अर्जुनसिंह गहिलोत,अविनाश पोहरे,सुनिल गाडगे , प्रभुदास बोंबटकार,निरज कुटे,अविनाश गवई,सतिश कांबळे,शुभम शेवलकार,सुनिल पाटील,हरीश सौंदळे,सचिन तायडे,चंद्रकांत इंगळे इत्यादी उपस्थित होते.