वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देवधरी घाटाजवळ
दि.१३ ऑगष्ट रोजी रात्री १०,३० चे दरम्यान विनायक जाधव ठाणेदार पोस्टे वडकी व पोस्टे स्टाफ यांचे सह पोस्टे हद्दीतील देवधरी घाट परीसरामधे पेट्रोलींग करीत असतांना ठाणेदार विनायक जाधव यांना गोपनिय बातमीदारा कडुन माहीती मिळाली की, हैद्राबाद वरून वडकी जि. यवतमाळ मार्गे एक तपकीरी रंगाचा 10 चाकी ट्रक क्र. टि.एस. 12 यु.ए. 1228 हा ट्रकमधे अवैद्य गुटाखा भरून नागपुर कडे जात आहे.अशा खात्रीलायक बातमी वरून ठाणेदार विनायक जाधव व पोस्टे स्टाफ यांनी देवधरी घाट येथे रात्री १०,३० वाजता नाकाबंदी करून वाहने चेक करत असतांना माहीती प्रमाणे एक तपकीरी रंगाचा 10 चाकी ट्रक क्र. टि.एस. 12 यु.ए. 1228 हा ट्रक संशईत रित्या आला सदर ट्रक पोस्टे स्टाफचे मदतीने थांबवुन ट्रक चालकास त्याचे नाव गाव विचारले असता आरोपी क्र. 1) गुड्डु देवनारायण कोरी वय 38 वर्ष क्र. 2) जगजिवणलाल कुमार वय 23 वर्ष दोन्ही रा. घाटमपुर, नवाबगंज, इलाहबाद, अटरामपुर उत्तर प्रदेश असे सांगीतले त्यांना ट्रकमधे कशाचा माल भरलेला आहे याबाबत विचारणा केली असता.त्याने ट्रकमधे अंड्याचे ट्रे भरलेले असल्याचे सांगीतले त्यास त्याबाबत कागदपत्राची विचारणा केली असता त्याने नसल्याचे सांगीतले वरून त्यांचेवर संशय आल्याने पोलीस निरीक्षक विनायक जाधव यांनी पोस्टे स्टाफचे मदतीने सदर ट्रकची तिनपद्री ताडपत्री काढुन पाहणी केली असता ट्रकमधुन गुटख्याचा सुगंध येत होता. ट्रकमधे सागर २००० पान मसाला गुटख्याचे 166 नग डाग (बोरी) किंमत 61,55,340/- रुपयाचा गुटखा मिळुन अला सदर गुटखा ताब्यात घेवुन अन्न व औषध प्रशाषण यांना माहीती देण्यात आली त्यांचे अधीकारी पोस्टे वडकी येथे हजर झाले असता त्यांचे फिर्यादी वरून आरोपी यांचे विरूध्द पोस्टे वडकी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरने साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी पांढरकवडा प्रदीप पाटील साहेब यांचे मार्गदर्शाखाली सपोनि विनायक जाधव ठाणेदार पोस्टे वडकी, पोलीस उपनिरिक्षक मंगेश भोंगाडे, पोहवा विनोद नागरगोजे, विलास जाधव,सुरज चिव्हाणे, रूपेश जाधव,विकेश घ्यावीवार,यांनी केली आहे