राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
अहेरी:- रानभाज्या विषयी बरेच जणांना माहिती नसल्याने रानभाज्याचे माहिती व महत्त्व जनसामान्यांमध्ये पोहचणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले. अहेरी येथील पंचायत समिती सभागृहात शनिवार 14 आगष्ट रोजी तालुका कृषी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत ‘किसान गोष्टी कार्यक्रम व रानभाजी महोत्सव’ कार्यक्रमात उदघाटनीय स्थानावरून बोलत होत्या. सदर कार्यक्रमात अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार तर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर सभापती भास्कर तलांडे, तालुका कृषी अधिकारी दीपक कांबळे, पं.स.सदस्या गीता चालूरकर, आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे उदघाटनीय स्थानावरून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम म्हणाले की, रानभाज्याचे महत्व, प्रचार , प्रसार व प्रसिद्धी आणि लोकजागृती व्यापक प्रमाणात होणे अत्यावश्यक असून रानभाज्या प्रदर्शनात थेट भाज्या बनवून आणल्यास प्रत्यक्षात रुची व आस्वाद घेतल्यामुळे अजून महत्त्व वाढणार असल्याचे म्हणत कृषी विभागाअंतर्गत आत्माच्या माध्यमातून कृषी मानव विकास मिशनातून महिला बचत गटांसाठी आर्थिक स्रोत उपलब्ध करून देत असल्याचे उल्लेख करून यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी नाविन्यपूर्ण योजनेचे स्तुती व प्रशंसा केले. तत्पूर्वी फित कापून महोत्सवाचे विधिवत उदघाटन केले. रानभाज्या महोत्सव व प्रदर्शनीत महिला बचत गटांनी सहभाग नोंदविल्याबाबत प्रशस्ती पत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. प्रास्ताविकातून तालुका कृषी अधिकारी दीपक कांबळे यांनी रानभाज्या व विविध कृषी विषयक माहिती विषद करून महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद डोंगरे यांनी तर उपस्थितांचे आभार दयानंद वाघमारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक(आत्मा) अमोल दहागावकर व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी लीला विडप्पी, मीना सिडाम, निरंजना वेलादी, रोशनी गेडाम, मीना गर्गम, सुरेखा डोंगरे, शोभा मडावी, लीना तोरेम, वंदना कोडापे, लक्ष्मी इदुलवार आदी महिला बचत गटाचे पदाधिकारी तसेच पूर्वाताई दोंतुलवार, ममता पटवर्धन, सारिका गडपल्लीवार व प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.