शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधी पिप्री खुर्द
अकोट :तालुक्यातील पिप्री खुर्द येथे स्मशानभूमीत 15 ऑगस्ट रोजी उंच झेप ग्रुप तर्फे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच झाडे लावा-झाडे जगवा असा संदेश देण्यात आला.पर्यावरणातील ढासळता समतोल पाहता मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. सध्या पावसाळा असल्याने वृक्ष लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे उंच झेप ग्रुप च्या वतीने वृक्षारोपण, संगोपन व संवर्धनाचा उपक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी वड पिंपळ,कडूनिब कडूबदाम आंबा आवळा आदी वृक्षांची रोपे लावण्यात आली. ग्रमपंच्यायत चे सदस्य यांनी वृक्ष व त्यांचे महत्व या विषयी विचार मांडले. पावसाळ्यात प्रत्येकाने किमान एक झाड लावावे व त्याचे संगोपन करावे असे आवाहन केले. यावेळी गोपाल इंगळे ब्रम्हदेव चातुरकर विनोद पळस्पगार मोहन भगत सतीश मानकर अमोल भांडे आणि उंच झेप ग्रुप चे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते आदींनी वृक्षारोपण केले. वृक्षारोपणासाठी राधेश्याम रवणकार मोहन भगत आनंद भगत बच्चू भगत यांनी परिश्रम केले उंच झेप ग्रुप यांनी रोप उपलब्ध करून दिले.
चिमुकल्यांनी दिला वृक्षारोपणाचा संदेशया उपक्रमात परिसरातील चिमुकल्या मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यावेळी आदींसह चिमुकल्यांनी सुध्दा वृक्षारोपण केले. या माध्यमातून वृक्षारोपण व संगोपनाचा संदेश चिमुकल्यांनी जनतेला दिला.


