स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड शहरात व इतर तर लग्नाची धावपळ पहावयास मिळत आहे. लग्न सोहळा म्हटलं की दोन्हीही परिवारामध्ये आनंदाचा मोहरच परंतु जुन्या पारंपारिक पद्धतीने विवाह सोहळा हा हिंदू रिती रिवाजाप्रमाणे पाच दिवस चालतो. या पाचही दिवसात पारंपरिक वाद्याचा सूर ऐका व्यास मिळतो. घरासमोर बँड वाजला की विवाह सोहळ्याचे लोकांना आमंत्रण मिळते. परंतु आज डीजेच्या तालावर तरुण पिढी थिरकताना दिसत आहे. डीजेच्या कर्णकरकश आवाज हा वयस्कर लोकांसाठी व आजारी व्यक्तीसाठी डोकेदुखीच झाला आहे. आनंदात सहभागी होण्याऐवजी बरेच जण या आवाजामुळे पळ काढताना दिसून येतात. काही विशिष्ट समाजावर डीजे.मुळे उपासमारीची पाळी ओढून येत आहे हे विशेष पारंपरिक पद्धत ही नामशेष होताना दिसून येत आहे.