संजय डोंगरे ग्रामीण प्रतिनिधी माना
माना हे गाव जवळपास 20 हजार लोकसंख्येचे गाव असून गावातील विद्यार्थी हे मुर्तीजापुर कॉलेज येथे दररोज येणे जाणे करतात.मात्र मूर्तीजापुर आगाराची ही बस नेहमी काही विद्यार्थ्यांना व प्रवाशांना घेऊन न जाता त्वरित माना येथील बस स्टॉप वरून निघते. व विद्यार्थ्यांना अवैध प्रवासी वाहतुकीचा सामना करावा लागतो. यावर या संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करावी. अशी माना येथील प्रवासी व विद्यार्थ्यांची मागणी आहे. सविस्तर वृत्तांत असा की मुर्तीजापुर आघाडीतून बस ही माना येथे 9 वाजून 30 मिनिटांनी पोचते. व तेथून बोरटा येथे जाते. व 10 वा. माना येथून विद्यार्थी व प्रवासी घेऊन जाते.या बसेसमुळे मूर्तिजापूर आगाराचे चांगलेच उत्पन्न असून, बस मधील चालकाच्या व वाहकाच्या हलगर्जीपणामुळे येथील नागरिकांनी आगारावर नाराजी व्यक्त केली. बस चालक हे नेहमी बस माना येथे पोहोचली की सरळवळण घेऊन काही प्रवाशांना बस मध्ये बसवते. व काही प्रवाशांना जागेवरच सोडते. त्यात मूर्तिजापूर येथे येणे जाणे व शिक्षणाकरिता शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश आहे. नाईलाजाने विद्यार्थ्यांना येथील अवैध प्रवासी वाहतूक करावी लागते. ही अवैध प्रवासी वाहतूक नियमाला अनुसरून नसून काही च्या गाड्या मात्र व्हॅलिडीटी संपलेल्या असतात. या अवैध प्रवासी वाहतुकीचे दुर्दैवाने काही अपघात घडला तर, विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका पोहोचू शकते. याला वाली कोण? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहे. तरी मुर्तीजापुर आगाराने या सर्व बाबींचा विचार करून, चार ते पाच मिनिटे देण्यात यावी, अशी मागणी माना येथील नागरिक व विद्यार्थी करीत आहेत. चौकट…. घडलेल्या घटनेची सदर चौकशी करून वाहक व चालकांना योग्य ते समज देऊन यापुढे असे होणार नाही. असे आश्वासन देतो. चांदुरकर साहेब, डीएम आगार मूर्तीजापुर.








