मनीष ढाले ग्रामीण प्रतिनिधी फुलसावंगी
परभणी जिल्ह्यातील जातीयवादी समाजकंटकांनी संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली. हि बाब अतिशय निषेधार्थ असल्यामुळे परभणी जिल्ह्यातील पोलिसांनी अटक केलेल्यामध्ये कायद्याचे शिक्षण घेत असलेला सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाल्यामुळे बौद्ध समाज व संविधान प्रेमी यांच्या भावना दुखावल्या गेल्या. राज्यात आणि विविध शहरात संविधान प्रेमी, बौद्ध अनुयायांनी बंद पुकारला आहे.त्या अनुषंगाने दि.१८ रोजी महागाव बंद ची हाक देण्यात आली . व मुख्य रस्ता चक्काजाम बौद्ध बांधव व संविधान प्रेमी यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी फुलसावंगी ते किनवट येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला पीडित सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना एक कोटीची मदत आणि सोमनाथच्या परिवारातीलसदस्याला शासकीय नोकरीत समाविष्ट करण्याची मागणी.या वेळी मोठ्या संख्येने बौद्ध अनुयाया सह संविधान प्रेमी उपस्थित होते. फुलसावंगी शहरात मुख्य बाजारपेठ छोटे मोठे व्यवसाय आज कडकडीत बंद ठेवण्यात आले. यामुळे महागाव बंदच्या आव्हानाला व्यापारी व जनतेने उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे.उपस्थित सर्व समाज ,कुणाल नाईक गणेश भगत विशाल बेलखेडे नितीन दादा कांबळे विक्की भिसे विठ्ठल सोनुने विजय पाटील विजय कोकणे,हे उपस्थित होते








