अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी, डहाणू
डहाणू तालुक्यातील मोडगाव पाटीलपाडा आणि उधवा कलमदेवी आश्रम शाळेत आज, 25 ऑक्टोबर 2024 रोजी, स्माईल फाउंडेशनच्या वतीने पथनाट्य सादर करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश बालविवाह, कुपोषण, आणि शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर जनजागृती निर्माण करणे हा होता.या कार्यक्रमात स्थानिक ग्रामस्थ—ताई, काकी, आणि आई यांना तसेच शाळेतील मुलांना सहभागी करून घेतले गेले. पथनाट्यातून या गंभीर सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकून त्यावर उपाययोजना करण्याचा संदेश देण्यात आला.डहाणू आणि तलासरी भागात कुपोषण आणि बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याचे लक्षात आल्यावर, स्माईल फाउंडेशनने या प्रश्नांवर स्थानिक पातळीवर जनजागृती करण्यासाठी हा पथनाट्याचा उपक्रम हाती घेतला. या प्रयत्नांद्वारे समाजातील नागरिकांना सजग आणि जागृत करून घेण्याचा उद्देश होता.