प्रतिनिधी: भरत पुंजारा
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
ब-हाणपुर-दि. २७ ऑक्टोबर रोजी बऱ्हाणपूर गावातील पुंजारा कुलदैवताच्या निमित्ताने गावकऱ्यांनी एकत्र येत साफसफाईचे आयोजन केले. उत्साहाने भरलेल्या या उपक्रमात सर्व वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेतला आणि देवस्थान परिसर स्वच्छता केली.
साफसफाईच्या या उपक्रमाचे आयोजन स्थानिक गावकरी पोलिस पाटील रविंद्र पुंजारा, नवतरुण मित्र मंडळ अविनाश पुंजारा, शंकर पुंजारा, आदिनाथ, महेश, महेंद्र, प्रदिप, शैलेश, कल्पेश, विनायक,रामु,रोशन, जगदीश, बाबुराव, अमित,अजय, स्वप्नील,सुरज, विकास,रुपेश,कैलास, श्रीधर, दिलीप, विश्वनाथ, सिताराम आणि देवस्थान कमिटीच्या सहकार्याने करण्यात आले होते. या प्रसंगी पुंजारा परिवारातील नागरिकांनी एकत्र येत गावातील स्वच्छतेचे महत्व अधोरेखित केले. धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचे प्रतीक असणाऱ्या या उपक्रमामुळे गावामध्ये स्वच्छता आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


