सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव : नांदगाव शहरातील प्रसिद्व व्यापारी श्री रिकबचंद कासलीवाल यांची नात व नांदगाव बाजार बाजार समिती असोसिएशन चे अध्यक्ष समीर कासरीवाल यांची कन्या आर्या समीर कासलीवाल हिची सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे . कुमारी आर्या येवला येथील विद्या इंटरनॅशनल स्कूल ची विद्यार्थिनी असून १७ वर्षाच्या आतील विभागीय स्तरावरील स्पर्धा नुकतीच नाशिक येथे पार पडली . जिल्हास्तरावर विजयी झालेल्या एकूण ६४ विद्यार्थिनी नी या स्पर्धेत सहभाग नोंदविला या स्पर्धेत विद्या इंटरनॅशनल स्कूल ची आर्या कासलीवाल हिने अनुक्रमे असिफा शफीक ‘ प्रिया गुप्ता ‘ आदिती जाधव ‘अक्षदा निल ‘ मुनमुन शर्मा या खेळाडूंवर विजय प्राप्त केला . तिची सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली तिच्या या कामगिरीबद्दल नांदगाव नांदगाव बाजार समितीचे सभापती सतीष बोरसे सचीव अमोल खैरणार ‘ रामनिवास करवा ‘ आनंद चोरडीया ‘ दिपक कासलीवाल ‘ कान्हा कंलत्री ‘ सोमनाथ घोंगाणे ‘ जयेश करवा ‘ संदीप खैरणार ‘ मुकूंद खैरणार ‘ अशोक पेढांरकर ‘ ज्ञानेश्वर वाघ ‘ निलेश घोंगाणे ‘ गोकुळ खैरणार ‘ बाळासाहेब गोराडे ‘ राहूल फोफलिया ‘ तसेच विद्या इंटरनॅशनल स्कुल या संस्थेचे संस्थापक डॉक्टर राजेश पटेल डॉक्टर संगीता पटेल प्राचार्य शुभांगी शिंदे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे येवला क्रीडा अधिकारी महेश पाटील तालुका क्रीडा संयोजक नवनाथ मुंडे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले पुढील महिन्यात १२ ते १४ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत तीला खेळण्याची संधी मिळणार आहे . क्रीडा शिक्षक किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले .