वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
दत्ताजी नेटके
तालुका प्रतिनिधी आंबेगाव
आंबेगाव – आंबेगाव शिरूर विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडी कडून अधिकृत असलेले उमेदवार दीपक पंचमुख हे दिनांक २९ रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज घोडेगाव या ठिकाणी दाखल करणारा असून मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते घोडेगाव या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दीपक पंचमुख यांनी केले आहे.
दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रधेय बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थकी ठरवून तालुक्यातील जनतेसाठी काम करणार आहे त्यासाठी मला ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करावे त्यांनी दिलेल्या सूचनानुसार काम करेल असेही दीपक पंचमुख म्हणाले यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या आंबेगाव तालुका महासचिव जयश्री शिंदे, रमाकांत जाधव, आंबेगाव तालुका अध्यक्ष शिवाजी राजगुरू, वंचीतचे युवा आघाडी तालुका अध्यक्ष विवेकभाऊ थोरात, वंचितचे माथाडी अध्यक्ष पकंज भाऊ सरोदे, वंचीत युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष शंकरराव शिंदे, बौद्ध महासभा आंबेगाव तालुका अध्यक्ष महेश भाऊ वाघमारे, वंचितचे उत्तर पुणे जिल्हा युवा उपाध्यक्ष भानुदास भोसले, वंचीत आघाडी माथाडी जिल्हा उपाध्यक्ष नफिस भाई शेख, वंचीत बहूजन आघाडी सचिव शिंदे गुरुजी यासह वंचित बहुजन आघाडी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.