संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
भिगवण शहरात मटका धंदा आजही राजरोसपणे सुरू असल्याची चर्चा परिसरात सुरू असून याबाबत नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील काही भागांमध्ये पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच मटका धंदा सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.मटका धंद्यावर कारवाई होत नसल्याबद्दल नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात असून, संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. शहरात विविध स्तरांवर या विषयाची चर्चा रंगली असून, मटका वाढत्या प्रमाणामुळे सामाजिक वातावरणावर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या सर्व चर्चांमुळे पोलिस प्रशासनाने ठोस कारवाई करावी आणि अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर लगाम लावावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.





