संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
इंदापूर तालुक्यातील बालचंदनगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री. रतिलाल राजाराम चौधर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. तब्बल ३७ वर्षे ४ महिने २९ दिवस प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सेवा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात येत आहे.हा सत्कार समारंभ मंगळवार दि.०२ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता बालचंदनगर पोलीस स्टेशन, ता. इंदापूर, जि. पुणे येथे पार पडणार आहे.कार्यक्रमास पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मा.संदीपसिंह गिल,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मा. गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग डॉ. सुदर्शन राठोड, साहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.श्री. पोलीस उपनिरीक्षक रतीलाल चौधर यांनी आपल्या सेवाकाळात शिस्तबद्ध कामकाज, जनतेशी सुसंवाद आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे विशेष ओळख निर्माण केली. त्यांच्या सेवेला सलाम करत सर्व पोलीस स्टाफ, पत्रकार,पोलीस पाटील व ग्राम सुरक्षा दल यांच्या वतीने हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.





