स्वरूप गिरमकर ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : तणावामुळे जगभरातील लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे. तणाव हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तणावामुळे इतर अनेक आजारांचा धोका वाढत जातो, त्यामुळे तणावाचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. तणाव येत असेल तर तुम्ही घरीच काही गोष्टी करू शकता. जामा नेटवर्क ओपनमध्ये प्रकाशित झालेल्या आणि डॉक्टरांनी आयोजित केलेल्या अलीकडील अभ्यासात असे आढळून आले की, सुदर्शन क्रिया योगाने इतर तणाव व्यवस्थापन तंत्रांच्या तुलनेत तणाव, नैराश्य आणि चिंता लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होत आहे.सुदर्शन क्रिया योग हा एक प्रकारचा श्वासोच्छवासाचा व्यायाम आहे, ज्यामध्ये लोक वेगाने श्वास घेतात आणि सोडतात. हे ब्रीदिंग एक्सरसाईज श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. जेणेकरून तणाव आणि स्ट्रेसच्या समस्येला तोंड देता येईल. हा योग हृदय गती, रक्तवाहिन्या, हृदयाच्या ग्रंथींची क्रिया, फुफ्फुसे आणि पचनसंस्था, यकृत आणि रोगप्रतिकारक प्रणालीचे नियमन याची काळजी घेतो. तसेच जळजळ नियंत्रित करतो. हे आसन पचन आणि रक्ताभिसरणासाठी चांगले असल्याचे म्हटले जाते. या आसनाव्यतिरिक्त भस्त्रिका, त्यानंतर नाडी शोधन प्राणायाम आणि ध्यान सराव यामुळे मानसिक त्रास कमी होतो आणि आरोग्य सुधारते.‘भस्त्रिका’ या शब्दाचा अर्थ ‘ब्लोअर’ आहे, कारण यामुळे शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह उत्तेजित होतो, शारीरिक आणि मानसिक पातळीवर उष्णता निर्माण होते, ज्यामुळे मन आणि शरीर दोन्ही संतुलित होते.सुदर्शन क्रियेमध्ये श्वासोच्छवासाचा वेग वारंवार बदलला जातो. सर्वप्रथम सुखासन आसनात बसून श्वास घ्या. त्यानंतर काही वेळ श्वास घेतल्यानंतर श्वासाचा वेग वाढवा. त्याचप्रमाणे श्वास घेण्याची आणि श्वास सोडण्याची गती वाढवा. लक्षात ठेवा की, जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा श्वास सोडण्याच्या वेळेच्या दुप्पट वेळ शरीरात श्वास रोखून ठेवावा लागतो. मग नंतर बाहेर सोडावा लागेल, यामुळे मनाला शांती मिळते आणि श्वासावर नियंत्रण येते.भ्रस्त्रिका प्राणायामच्या सरावाने फुफ्फुसं मजबूत होतात, त्यामुळे मनही शांत होते. यामध्ये दीर्घ श्वास घेतला जातो. सुदर्शन क्रिया योग सातत्याने केल्यास त्याचा मानसिक आरोग्यावर जलद परिणाम दिसून येतो. हा योग केल्याने मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढतो. तणाव दूर झाला की झोप सुधारते. त्यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.