भरत पुंजारा ग्रामीण प्रतिनिधी पालघर
दिनांक २७ ऑक्टोबर २०२४ रोजी, जव्हार तालुक्यातील वडोली गावात यारी दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून दिवाळी साजरी करण्याचा खास उपक्रम राबविण्यात आला. निराधार आजींना सोबत घेऊन त्यांना मिठाई आणि टॉवेलचे वाटप करत दिवाळी साजरी करत, यारी दोस्ती ग्रुपने एक आदर्श उपक्रम उभारला. त्याचबरोबर गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणात सहकार्याचा हात पुढे केला.विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करून त्यांचे कलागुण प्रकट करण्यासाठी संधी दिली गेली. स्पर्धेत उत्तम प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांकासाठी मान्यवरांच्या हस्ते विशेष बक्षिसे देण्यात आली.त्यासोबतच, गरजेला रक्तदान केलेल्या सदस्यांचा प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यामुळे रक्तवीरांच्या समाजसेवेची भावनाही अधोरेखित करण्यात आली.या कार्यक्रमात दीपक गावंडे सर, चावरे सर, प्रविण आवरी सर, रमेश चौधरी सर, सुनिल भरसट सर, दाजी धूम सर, के. के. हिरकुडा सर, प्रल्हाद कागणे सर, तसेच पत्रकार श्री. मनोज कामडी सर आणि वडोली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यारी दोस्ती ग्रुपच्या या विशेष कार्यक्रमाला नाशिक, डहाणू, तलासरी, आणि पालघर येथील सदस्यांनीही हजेरी लावली. दिवाळी निमित्त इतर तालुक्यांमध्येही यारी दोस्ती ग्रुपच्या सदस्यांनी मिठाईचे वाटप केले, ज्यामुळे सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली.या यशस्वी उपक्रमासाठी यारी दोस्ती ग्रुपच्या सर्व सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.











