प्रकाश केदारे उप-जिल्हा प्रतिनिधी, पाथरी
दि.१७ डिसेंबर काल दि.१५ डिसेंबर रोजी तालुका पाथरी येथे अमृत.व ध्रुव मंडळाची मीटिंग सोमेश्वर गणेश मंडळ वैष्णव गल्ली पाथरीव परशुराम संस्कार सेवा संघ तालुका पाथरी च्या वतीने समाज बांधवांना अमृत व ध्रुव योजनेची माहिती देण्यासाठी मीटिंग आयोजित केली होती या दोन्ही योजनेच्या माहिती देण्यासाठी ध्रुव संस्थेचे कार्यकारी अधिकारी भूषणजी धर्माधिकारी व राज्य समन्वयक दीपक जी जोशी आणि जिल्हा समन्वयक अनिरुद्ध जी काटे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी दीपक जी जोशी यांनी सर्वांना सोप्या भाषेमध्ये उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले व लगेच अमृत योजना व ध्रुव योजना यांच्या माध्यमातून विविध कार्यासाठी उपस्थित त्यांचे अर्ज भरून घेतले या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेवाळकर सर हे होते. प्रथमतः भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळीव्यासपीठावर बाळू काका डावरे, अँड कोंत साहेब, दुर्गा दास ढोले, प्रकाश देवकेदारे, आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रकाश केदारे यांनी मानले या वेळी जमलेल्या बऱ्याच समाज बांधवांनी आपापल्या उद्योग व्यवसायासाठी व प्रशिक्षणासाठी विविध अर्ज भरण्यात आले .यावेळी महिलांची संख्या पण विशेष दिसून आली. या कार्यक्रमासाठी पाथरीतून समाज बांधवांचा भरपूर प्रतिसाद लाभला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सोमेश्वर गणेश मंडळ पाथरी व परशुराम संस्कार सेवा संघ पाथरी व नितीन पाटील मित्र मंडळ पाथरी यांच्या वतीने परिश्रम घेण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमेश्वर गल्ली येथील तरुणांनी परिश्रम घेतले.








