सुदर्शन मंडले ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर
आळेफाटा( ता. जुन्नर )महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ जुन्नर ची नुकतीच नवीन कार्यकरणी निवड रविवार( दि. १५) रोजी जाहीर करण्यात आली आहे.यात अध्यक्ष पदी बाबाजी टाकळकर यांची तर उपाध्यक्ष पदी चंद्रकांत औटी व अशोक कोरडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कांदळी (ता. जुन्नर ) येथे झालेल्या वार्षिक मिटिंगमध्ये सर्वानुमते निवड करण्यात आली.महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या जुन्नर तालुका कार्यकारणीच्या बैठकीत तालुक्याचे मावळते अध्यक्ष सुधाकर सैद, सचिव किशोर वारुळे, सचिन भोर आणि भाऊसाहेब वायकर, गंगाराम औटी यांच्या सहकार्याने निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे राज्याध्यक्ष समीर राजे पठाण, समर्थ भारत वृत्तसमुहाच्या संपादिका स्नेहा बारवे,आंबेगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघांचे अध्यक्ष भगवान भोर आणि जुन्नर तालुक्यातील अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.नूतन कार्यकारणी २०२४-२०२५अध्यक्ष – बाबाजी टाकळकर उपाध्यक्ष -चंद्रकांत औटी, अशोक कोरडे कार्याध्यक्ष – मयूर ढोबळे सचिव – विजय बोंबले खजिनदार – डॉ.जालिंदर वाजे संपर्कप्रमुख – राहुल तांबे प्रसिद्धीप्रमुख – मिथुन मोजाड संघटक – गंगाराम औटी , केतन ताम्हाणे, स्नेहल औटी कायदेशीर सल्लागार – गौरव रोकडेनियोजन समिती अध्यक्ष -मनोहर हिंगणे कार्यकारी समिती अध्यक्ष -सुदर्शन मंडले विभागीय अध्यक्ष -:आळेफाटा – गंगाराम औटी ओतूर – दुष्यत बनकर जुन्नर – अक्षय डोके नारायणगाव – रामकृष्ण भागवत








