लोकप्रतिनिधींनी उद्घाटनात व्यस्त
वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव : वाढोणा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत वाढोणा बाजार सर्कल मधील 10 ते 15 खेड्यावरील शेतकरी, शेतमजूर, उपचारासाठी येतात पण या आरोग्य केंद्रात अद्याप एकही डॉक्टर नसल्याने त्या शेतकरी ,शेतमजुरांना खाजगी डॉक्टरांकडे उपचारासाठी जावे लागत आहे व या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत जास्त खेडे येत असल्यामुळे या आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची जागा असून अद्याप येथे एकही डॉक्टर कार्यरत नाही उपचाकरिता गेले असता नर्स कडून गोळ्या घ्याव्या लागत आहे तसेच या शेतकरी, शेतमजुरांना आपला उपचार करण्याकरिता खाजगी डॉक्टराचा सल्ला घ्यावा लागत आहे व खाजगी डॉक्टराकडून यांची लूट होत आहे कारण पाच रुपयांच्या चिठ्ठीत उपचार होणारा आता 500 ते 600 रुपयात करावा लागत आहे लोकप्रतिनिधींनी फक्त आणि फक्त उद्घाटनात व्यस्त आहे.या गोष्टीची दखल घेऊन या आरोग्य केद्राला कायमस्वरूपी डाॅक्टर देण्यात यावा अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.











