स्पर्धेत 13 संघानी घेतला सहभाग.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/धानोरा:- गडचिरोली पोलीस अधिक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) मुंढे,अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख,अहेरी अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे,उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाने धानोरा तालुक्यातील येरकड येथील पोलीस मदत केंन्दात दि.15/2/022 ते 16/2/022 या दोन दिवशीय भव्य वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.सदर स्पर्धेमध्ये 13 कबड्डी संघानी सहभाग नोंदवला.सदर स्पर्धेस येरकड पोलीस मदत केन्द हद्दीतील सर्व सरपंच,पोलीस पाटील गाव पाटील तसेच परिसरातील 200 ते 250 नागरिक उपस्थित होते.तसेच सिआरपीफफचे अधिकारी खान व त्यांचे अमलदार,एसआरपीचे चे अधिकारी राठोड,पोलीस उपनिरिक्षक पाटील,ठाकरे व सर्व अमलदर हजर राहून कबड्डी स्पर्धेचा आनंद घेतला.स्पर्धेत प्रथम बक्षीस विजेता कबड्डी संग जेवेलवाही संगाला 3000 रुपये,द्वितीय बक्षिस विजेता संग जप्तलाईली 2000 रुपये,तृतीय बक्षीस विजेता संग कोवानटोला 1000 रूपये देण्यात आले.व हजर सर्व स्पर्धक व लोकांना अल्पोपहार देऊन पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी गंधकवाड यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व काही अडी अडचणी असल्यास पोमकेला कळवावे सूचना देऊन स्पर्धेची सांगता केली.